शुभम जिराफे यांचा आगळा वेगळा उपक्रम...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

मेळघाटातील आदिवासी बहुल भागाचा विचार जर केला तर या ठिकाणी एक नाही अनेक समस्या  पाहण्यासाठी मिळते. त्या मधे धारणी तालुका पासून खेडे गाव हे दूर असल्या मुळे त्या भागात ज्या सुविधा लवकरात लवकर मिळायला हव्या ते मिळत नाही. त्याच समस्या मधे बँक मधून पैसे काढणे किंवा बॅंकेचे व्यवहार करणे ही एक मोठी समस्या आहे . जर पैसे काढायचे असेल तर धारणी तालुक्यातील आदिवासी बांधवांना दूर गावावरून तालुक्या च्य्या ठिकाणी यावे लागते. या मुळे गावकऱ्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालावे लागते. त्या मुळे ही समस्या दुर व्हावी म्हणून धारणी तालुक्यातील दुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.शुभम जिराफे यांनी स्व खर्चाने लोकांना ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या करिता ते आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक  गावात जाऊन ही लोकहिताची सेवा देणार आहे. या अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात धारणी तालुक्यातील धारणमहू या गावातुन सुरूवाती केली आहे. आज धारणमहू गावकऱ्यांनी खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून गावातील पोलीस पाटील सौ. सावलकर मॅडम ह्या होत्या. तसेच कार्यक्रमाचे आयोजक म्हणून श्री. शुभम जिराफे आणि त्यांचे सहकारी पुनीत कुहेडेकर , प्रणय मेटकर आणि गावकरी उपस्थित होते.
Previous Post Next Post