सातपुडा शिक्षण संस्था सलांग्नित स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी/उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा बोराळा (खुर्द) या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्याना योग्य ते मार्गदर्शन केले आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षा घेतल्या त्यामध्ये लेखी स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली आणि विविध खेळांचे आयोजन केले त्यामध्ये धावण्याची स्पर्धा,लंगडी, खो-खो, संगितखुर्ची,बुद्धिबळ,इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले आणि मुलांना शाळे मध्ये येण्या साठी प्रेरित केले.यामध्ये शाळेचे व्यवस्थापन समिती(अध्यक्ष) श्री प्रमोद वाघ, केंद्रप्रमुख श्री योगेश वाघ सर,आणि मुख्याध्यापक श्री इंगळे सर आणि शिक्षक वृंद यांचा मुख्य सहभाग लाभला. त्यामध्ये स्वतंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी/उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळकरी विद्यार्थ्याना क्रमांकानुसार त्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वाटप केले आणि सर्व शाळकरी विद्यार्थ्याना भिस्किट,पेन,पेन्सिल, वही, यांचा वाटप केला.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.योगेश गवई सर, उपप्राचार्य सतीश धर्माळ सर, उपप्राचार्य चंद्रशेखर भोपळे सर, कार्यक्रम समन्वयक श्री अविनाश आटोळे सर, प्रितेश वानखडे सर, विस्तार शिक्षण विषयतज्ञ जिवेश साळी सर, विद्या कपले मॅडम, इत्यादी यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली कृषी/उद्यानविद्या कार्यानुभव तसेच क्रीडा कार्यक्रम व राष्ट्रीय स्वयसेवक संघ कार्यक्राअंतर्गत आयोजित करण्यात आला व योग्य रित्या पार पडला त्यावेळी ग्रामीण कृषि/उद्यानविद्या कार्यक्रमाची जबाबदारी कृषीदुतांन कडून पार पडली.त्यामध्ये अनिकेत धनोकार,गौरव मिसळकर,श्रेयस फुलारी, वैभव मोरे,कुणाल मोहोकार, प्रणव देशमुख,वैभव फूसे, रेहान मोहम्मद, तेजस गौंडकर,रोशन धोटे,चेतन दिवरे, विजसिंह डाबेराव,गौरव चोरीवाल, व्यंकटेशवरा धनिरेड्डी या कृषीदूतांचा सहभाग होता.
काय ते शाळा-काय त्या शाळेचे विद्यार्थी-काय तो RAWE/RHWE कार्यक्रम...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
