विदयानिकेतन सीबीएसई स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घडवले पंढरीच्या वारीचे दर्शन..विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला नामाचा गजर...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विदयानिकेतन सीबीएसई स्कुलमध्ये आषाढी एकादशी च्या विशेष दिनावर पंढरीची अनुभूती देणारी शाळेच्या परिसरात वारकरी सांप्रदायाची वारी काढण्यात आली.ज्याप्रमाणे पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा हे संप्रदायाचे  वैशिष्ट्य आहे. आषाढी वारीत लाखो भाविक पायी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.  हा पंढरपुरातील आनंद सोहळा विदयानिकेतन च्या विद्यार्थ्यांनी वारी काढून आनंद सोहळा अनुभवला ज्यामध्ये  कृष्णा मोहोळ याने पंढरीच्या विठ्ठलाची भूमिका साकारली. तर अद्वैत नाईक-संत ज्ञानेश्वर महाराज, नैतिक टेंबरे- संत तुकाराम महाराज, मंथन राऊत -संत नामदेव महाराज, नेतल वानखडे-  मुक्ताबाई, भूषण धांदरे- गोरा कुंभार, साई वानखडे- छत्रपती शिवाजी महाराज, तर मावळ्यांची भूमिका अनुज राऊत व रुद्रेश मारवे या विद्यार्थ्यांनी साकारली. वारीत असलेले विद्यार्थी वारकरी पोशाखात डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी टिळा, हाती टाळ, वीणा, पताका, आणि विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम  विठ्ठला नामाच्या गजरात दंग झालेल्या वारकरी विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या आनंदी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी  रिंगण, फुगळी व विठ्ठलाचे अभंग, तर माऊली माऊली  या गीतावर 35 विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. यावेळी शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांच्या सादरीकारणाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे नृत्य शिक्षक नकुल महामुने, कला शिक्षक अजिंक्य काडगळे, संगीत शिक्षक सागर ठाकरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजुश्री शेंडे, दीप्ती हरताळकर, नीलिमा राऊत,आभा चौधरी, रेणुका भागवत, गायत्री शिंदे, मनीषा मलवार, प्रीती नैन, प्रियंका हटवार, आकांक्षा तूपट, पूजा कोडापे, भाग्यश्री क्षिरसागर,  अर्चना तापडिया, कल्याणी जयसिंगपुरे, रेवती पाटील, तृप्ती देशमुख, योगेश चौधरी, मधुकर निखार, प्रवीण भगत, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

माझा विठ्ठल माझी माऊली;

चाललो आम्ही घेऊनीया पालखी ’!

Previous Post Next Post