दिनांक 14 जुलैपासून साफिडाॅन जिंद हरियाणा येथे सुरू होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील चाचणी परीक्षेसाठी नांदगाव खंडेश्वर येथील सहा खेळाडू रवाना झाले.येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख अकॅडमीचे कबड्डीपटू खेळाडू निखिल गोंडाणे, शुभम झिमटे, अक्षय कांबळे, मोहन दिवेकर,दर्शन मारोटकर,दीप भुरे यांची फेब्रुवारीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली होती. त्यांचे क्रीडा नैपुण्य पाहून त्यांची राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य प्राप्त करून अमरावती जिल्ह्याचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा चांदुर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी व्यक्त केली. त्यांनी सर्व खेळाडूंना भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजीत पाटील ढेपे यांनीही भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा संदेश दिला.फुबगाव येथील परमहंस संत सुरेश बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन खेळाडू नागपूर मार्गे हरियाणा कडे रवाना झाले. कबड्डी मध्ये प्राविण्य प्राप्त करून नांदगाव खंडेश्वर व अमरावती जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली व शुभेच्छा संदेश दिले.
राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी चाचणी साठी जिंद हरियाणा येथे खेळाडू रवाना...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..
