तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हे मालमत्ता कायदे प्रमाण सुरू असलेले रस्त्याचे प्रकरण व अधिनियम कलम 85/2 सुरू असलेले प्रकार यामध्ये जो व्यक्ती पैसे देईल त्याच्या बाजूने निकाल देऊ व अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊ काम करत असल्याने तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास देत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चा यांनी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व खासदार रामदास तडस आमदार प्रताप अडसड यांना निवेदन देत नायब तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशात प्रकरणात चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.तालुक्यातील गरीब जनता न्यायालयीन कामकाजापुढे त्रस्त झाली आहे व आपले सर्व प्रकार खरे असताना सुद्धा त्यांना न्यायापासून वंचित राहावे लागत आहे कारण नायब तहसीलदार एस. डी.शाहारे यांच्या न्यायालयात फाईल वरील सर्व प्रकरणाचे आदेश हे चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे कारण सातबारा वडिलांच्या नावाने रस्त्यासाठी अर्ज केला मुलाने व त्यालाही रस्ता देऊन आदेश केला अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात निकाल थांबून ठेवला जातो व मनमर्जीप्रमाणे आदेश दिले जात असल्याचा आरोप यावेळी निवेदनात करण्यात आला असून ही निवेदनाद्वारे नायब तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाच्या प्रकरणातील आदेशाची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे भारतीय जनता युवा मोर्चा नांदगाव खंडेश्वर च्या वतीने विभागीय आयुक्त यांच्यामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देण्यात आले व हेच निवेदन खासदार रामदास तडस, आमदार प्रतापदादा अडसड, जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी निवेदन देताना धामणगाव भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपुरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल साकुरे,चांदुर रेल्वे सरचिटणीस समीर भेंडे,नांदगाव भाजपाचे अध्यक्ष दीपक तिखिले, शहराध्यक्ष नवल खीची,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे,सरपंच पंकज मेटे, माजी सरपंच मंगेश ठाकरे, युवा मोर्चा सचिव अमोल इंगोले, उपाध्यक्ष अक्षय म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य महेश कडू, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, रुद्रेष शिंदे, सरपंच राहुल वनवे,उपसरपंच अमोल गुल्हाने, उपसरपंच वाल्मीक इंगळे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य निखिल मोरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षअखिलेश पोळ, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष ऋषिकेश ढेपे यांच्या सह भारतीय जनता युवा मोर्चा नांदगाव खंडेश्वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या नायब तहसीलदाराची चौकशी करून निलंबन करा... विभागीय आयुक्तांकडे युवा मोर्चाचे निवेदनाद्वारे सादर..उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्रताप अडसड यांना दिले निवेदन..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
