जळगांव जामोद तालुक्यातील बहुजन समाजातील पहिला सी. ए.रोशन कोकाटे ने मिळविला बहुमान...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी सुपो या ग्रामीण भागात जि. प. शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील पत्रकार गजानन कोकाटे पाटील यांचा मुलगा रोशन कोकाटे याने मे 2022 मध्ये झालेल्या चार्टर अकाउंट (C. A. ) परीक्षेत दोन्ही ग्रुप एकत्र देवून यश संपादन केले वयाच्या २१ व्यां वर्षी CA झाला.त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे विशेष अभिनंदन होत आहे.रोशन याने जेमतेम परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात प्राथ. शिक्षण प. सुपो येथे जि. प.शाळेत घेवून 10 वी पर्यंत दीं न्यू ईरा हायस्कूल जळगांव जा. येथे पूर्ण करून स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ विद्यालयात 12 वित अकाऊंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून CA होण्याची इच्छा बोलून दाखविली.आणि आज ती पूर्ण केली. 2016-17 मध्ये प्रा.कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनात त्याने बारावी सोबतच CA foundation exam उत्तीर्ण केली 2018 पासुन नागपूर येथे त्याने B.Com. सोबत CA चे शिक्षण पूर्ण केले.वयाच्या 21 वर्षात डिग्री आणि अतिशय कठीण व दुर्मिळ अशी मास्टर डिग्री मिळविण्याचा मान एका ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील रोशन कोकाटे यांनी मिळविला..त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे विशेष अभिनंदन होत आहे.

Previous Post Next Post