अजय पारस्कर यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा. जळगांव जामोद शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदी अजय पारस्कर यांची करण्यात आली नियुक्ती...


जळगांव जा.विशेष प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील काँग्रेस मधील एक नावाजलेले व्यक्तीमत्व कट्टर काँग्रेस चे वजनदार नेतृत्व , एक चांगले संघटक अजय पारस्कार यांची खासदार प्रतापराव जाधव आणि भावी मंत्री आमदार संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रवेश झाला तसेच शिवससेनेच्या जळगाव जामोद  तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली..!अजय पारस्कर आपल्या समर्थकांसह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणार आहेत.


Previous Post Next Post