जळगाव जामोद प्रतिनिधी:--
ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारा दुवा असलेले जळगाव जामोद आगाराला घरघर लागली असून कर्मचारी, चालक आणि वाहकांचा अभाव, बस गाड्यांचा अभाव, नादुरुस्त गाड्या त्यामुळे हे आगार बंद पडण्याच्या मार्गावर आहे एसटी परिवहन मंत्रालय तथा लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.सहाय्यक वाहतूक अधीक्षक,वाहतूक निरीक्षक,सहायक वाहतूक निरीक्षक,वाहतूक नियंत्रक,लिपिक,वरिष्ठ लिपिक,चालक,वाहक,यांत्रिक आर्ट,टायर फिटर,आर्ट,बॉडी फिटर असे ऐकून 262 पदे मंजूर असून सध्या स्थितीत केवळ 184 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या चालक आणि वाहकांची संख्या एकदम कमी आहे. या ठिकाणी 110 चालकांची आणि 110 वाहकांची गरज आहे.परंतु सद्यस्थिती पाहता 86 चालक आणि 64 वाहक कामावर आहेत.तर 24 चालक आणि 46 वाहकांची पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्याची गरज आहे तर पुर्ण आगारात ऐकून 78 पदे रिक्त आहेत. मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.आगारामध्ये 54 बस गाड्या मंजूर असून सद्यस्थितीत 44 बस गाड्या आहेत तर यामधील ही 6 बस गाड्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे बऱ्हाणपूर,औरंगाबाद,नागपूर,अमरावती आणि अकोला येथील अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. जळगाव जामोद संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्याची निगडीत भालेगाव,जिगाव,काटेल धाम आणि मेंढळी ग्रामीण फेर्या लवकरच सुरू केले जातील त्यामुळे आणखीही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंद होण्याची शक्यता आहे.2019 पासून 2021 पर्यंत या आगारातून 32 कर्मचाऱ्यांनी आपल्या बदल्या करून घेतल्या. तर दोन वर्षात येथील 14 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. येथे कर्मचारी पदे रिक्त असतानाही बदल्या कशा देण्यात आल्या हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे बदल्यांचे गौडबंगाल काय? याचीही चौकशी व्हावी.अशी मागणी होत आहे. येथे कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त तर घाटावरील आगारात मात्र अतिरिक्त कर्मचारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगाव जामोद आगारातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी आणि नवीन आगाराला बसगाड्या देण्यात याव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा प्रवासी वर्गामधून दिला आहे.
