हिवरखेड येथील अंध पती पत्नीवर प्राणघातक हल्ला... हल्ल्यामध्ये पत्नी चा मृत्यू तर पती गंभीर जखमी...


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड विशेष प्रतिनिधी...

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे एका दिव्यांग दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला असून जोडप्यातील दिव्यांग पत्नी जागीच ठार झाली असून दिव्यांग पती गंभीर जखमी असून हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले. हे भीषण हत्याकांड कौटुंबिक  वादातून झाल्याचे बोलले जाते घटनेनंतर आंधळ्या मुलाची आई आणि मोठा भाऊ घरून तेल्हाराच्या दिशेने फरार झाले होते याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि राजू उर्फ गजानन इंगळे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या दोन्ही आई मुलांना ताब्यात घेतले असून हिवरखेड च्या दिशेने निघाले आहेत. हिवरखेड येथे पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. मृतक महिलेचे नाव सत्यभामा शांताराम कंडारे वय अंदाजे 28 व गंभीर जखमी युवकाचे नाव शांताराम कंडारे वय अंदाजे 30 आहे.हिवरखेड पोलीस घटनेचा तपास करीत आहेत, घटनास्थळी एस,डी ,पी ओ, पोलीस अधिकारी रितू खोकर आकोट यांनी भेट दिली ,

Previous Post Next Post