जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पिंपळगाव काळे बीट मधील पिंपळगाव काळे ते कुह्रा रोडवर येत असलेल्या करणवाडी येथील बस थांब्यामध्ये दिनांक 17 जुलै रोजी रात्रीच्या वेळेस एका 75 ते 80 वर्षीय वृद्धाचे प्रेत आढळून आले आहे. करणवाडी येथील गावातील नागरिकांना मृत वृद्धाविषयी विचारणा केली असता सदर वृद्ध हा तीन ते चार दिवसापासून बस थांब्यामध्ये राहत होता. परंतु गावातील नागरिकांना त्या वृद्धाविषयी कोणतीही माहिती नाही. वृद्ध जिवंत होते त्यावेळी काही नागरिकांनी वृद्धाला नावगाव विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. सदर मृत वृद्धाचे प्रेत जळगाव जामोद पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली असून पोलिसांनी वृद्धाची ओळख पटविण्याचे तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे. सदर वृद्धाची ओळख पटल्यास जळगाव जामोद पोलीस स्टेशन व 99 23 48 19 47 तसेच 79 72 37 40 79 या क्रमांकावर फोन करून सदर वृद्धाविषयी माहिती द्यावी असे आवाहन जळगाव जामोद पोलिस स्टेशन ने केले आहे.
