हिवरखेड पोलिस स्टेंशन हद्दीत येत असलेल्या वारी भैरवगड या डोहात गेल्या दोन महिन्यांत अनेक बळी गेले असून शासन मात्र झोपेचे सोग घेऊन सुन्न राहते आणि इकडे या डोहात ,एक के बाद एक मुत्यू होत राहतो,अनेक वृत्तपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या या डोहाचा बंदोबस्त करण्यात यावा परंतु शासन काहीच पर्यटकांच्या जीवाची काळजी घेत नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे, दिनांक १६ जून च्या दुपारी पुन्हा वारीच्या डोहात एका तरुणाचा बुडून मुत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली हिवरखेड पोलिसांनी मुतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला असता मुतकाची ओळख वार्ड क्र २ मधील इंदिरा नगरातील राहणाऱ्या अनिल चंद्रकांत दामधर वय अंदाजे ३८ वर्षे अशी ओळख पटली याच वेंटाळात यापूर्वी याच रविवार रोजी एका तरुणाचा बुडून मुत्यू झाला होता हे विशेष माहिती असून याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,तसेच अनिल दामधर हे यापूर्वी मरणाच्या दारातून परत आले, त्यांना त्यावेळेस जीवनदान मिळाले होते,परंतु नीती काय करेल कधी चक्र फिरेल ते मात्र मानवाच्या हाती नाही, १६ जूनला परत अनिलला मरणाच्या दारात जावे लागले आणि अनिल दामधर यांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली, त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,वडील आहेत, त्याचा मुत्यू वारीच्या डोहात झाल्याची माहिती हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये नमूद करण्यात आली,पुढील तपास हिवरखेड पोलीस करत आहे,
वारीच्या डोहात हिवरखेडच्या अनिलचा मुत्यू,एकाच वेटाळातील दोन तरुणांचा घेतला डोहाने बळी,वारीच्या डोहाने या दोन महिन्यांत घेतले अनेक बळी, शासन सुन्न अवस्थेत,
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
