बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
सिंदखेडराजा येथे भूमिपुत्र खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब यांचे आगमन प्रंसगी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले उपस्थित हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या निर्णयाला पांठिबा दिला.माँ साहेब जिजाऊ जन्मस्थळी जावून राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.फुलांची उधळण करण्यात आली,कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला,प्रतापगड अभेद्यच अशा प्रंचड घोषणा उपस्थित हजारो शिवसैनिकांनी दिल्या.यावेळी आमदार डॉ.संजय रायमुलकर,माजी आमदार डॉ.शंशिकात खेडेकर,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव,उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे,दिपक बोरकर,ता.प्रमुख शिवप्रसाद ठाकरे,नगराध्यक्ष सतिष तायडे,जि.प.सदस्य पती धनराज शिंपणे,सिंदखेडराजा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
