मुलांवर अपेक्षाच ओझ देऊ नका -बाल मानसशास्त्रज्ञ डॉ .अमोल देशमुख,शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या - बार्टी प्रकल्प अधिकारी -महेंद्र शामदे गुणवंताचा वृक्ष देऊन सत्कार..


 सिंदखेडराजा सचिन खंडारे

नेहरू युवा केंद्र तसेच स्वराज प्रशिक्षण केंद्र अंतर्गत साखरखेर्डा येथे दिनांक 21 जुलै रोजी  दहावी ,बारावी तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचा,पुष्पगुच्छ व झाडे देऊन सत्कार करण्यात आला,अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तेवढाच चांगला सोहळा साखरखेर्डा येथील माळी पेठ येथे पार पडला,यावेळी झालेल्या समारंभामध्ये,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टी चे प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून बाल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अमोल देशमुख हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून युवा उद्योजक अनिल मोरे, पोस्ट ऑफिसचे निरंजन शुक्ला,पत्रकार सचिन खंडारे, हे होते,सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे असते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं,त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतेतून कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मंगेश राजगुरू यांनी नेहरू युवा केंद्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध संकल्पना व कार्यक्रमाची रूपरेषा विशद केले,त्यानंतर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अमोल देशमुख यांनी उपस्थितांना मोलाचा मार्गदर्शन केले,लहान मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दडपण आणू नका अपेक्षाच ओझं ठेवू नका,असं डॉ . देशमुख यांनी सांगितले,त्यानंतर पोस्ट ऑफिस चे निरंजन शुक्ला युवा उद्योजक अनिल मोरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यानंतर बार्टी चे  प्रकल्प अधिकारी .महेंद्र शामदे यांनी शासनाच्या विविध योजना असून समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले,यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते,गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व झाडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,तसेच शिवणकला प्रशिक्षण करताना  ज्या महिलांनीप्रशिक्षण पूर्ण केले अशा महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ई एस . जुनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य दसरे सर यांनी केले,तर सूत्रसंचालन सचिन खंडारे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,विनायक खरात,मंगेश राजगुरू,अजय खंडागळे,अरविंद खंडारे,यांनी परिश्रम घेतले,

Previous Post Next Post