निंभोरा फाट्यावरील विहिरीत आढळले महिलेचे प्रेत.पतीने केले पत्नीला जिवे मारण्याचा आरोप?पोलिसांची चौकशी सुरू...


जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक फाट्यावरील विहिरीत अकोली येथील विवाहित महिलेचे प्रेत मिळाल्याने ओळखी अंती मृतक स्त्रीच्या पतीने आरोप केला की मारोड तालुका संग्रामपूर येथील निलेश माने नामक व्यक्तीने माझ्या पत्नीसोबत अत्याचार करून विहिरीत लोटून जीवे मारल्याचा संशय पत्रकारा सोबत बोलताना व्यक्त केला.दिनांक 15 जुलै 2022 ला करुणा सुरेंद्र वानखडे वय 27 वर्ष राहणार अकोली खुर्द तालुका संग्रामपूर हल्ली मुक्काम खांडवी ही तिच्या मुलांसह खांडवी येथे माहेरी राहत होती. मृतक करुणाचा पती सुरेंद्र वानखडे त्याचा मित्र निलेश माने राहणार मारोड तालुका संग्रामपूर ह्याचे सोबत विहीर खोदण्याचे काम करत होता. सुरेंद्र चे निलेश माने कडे तीन हजार रुपये घेणे बाकी होते मागील पाच सहा महिन्यापासून सुरेंद्र वानखडे हा मुंबईला कामाला गेला असता मृतक करूना ही तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहत होती. आणि तिने वडिलांची शेती केली होती शेतात गवत झाल्याने निंदनासाठी पैशाची गरज असल्याने तिने पती सुरेंद्र ला फोन करून पैशाची मागणी केली होती. करुणास त्यांना सांगितले की निलेश कडे तीन हजार रुपये आहे ते मागून घे असे सांगितले काल दिनांक 15 जुलै रोजी तिने पतीला फोन लावून सांगितले की निलेश ने मला पैसे घेण्याकरिता निंभोरा फाट्यावर बोलाविले त्यामुळे ती काल निंभोरा बुद्रुक फाट्यावर पैसे घेण्यासाठी गेली होती ती संध्याकाळ पर्यंत घरी न आल्याने तिच्या फोनवर नातेवाईकांनी फोन केला असता तो लागला नाही मग तिचा शोध घेतला असता दिनांक 16 जुलैच्या सकाळी घटना उघडकीस आली.सदर मृतक करुणा च्या पतीचा आरोप आहे की निलेश माने याने पत्नीवर बळजबरीने अत्याचार करून विहिरीत लोटून जीवे मारले असुन त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रकारा सोबत बोलताना केली आहे.सध्या स्थितीमध्ये जळगाव जामोद पोलीस ठाण्यात सदर प्रकरणात पोलिसांनी मृतक चा भाऊ निलेश अशोक डोंगरदिवे वय 30 वर्ष राहणार खांडवी याच्या दिलेल्या तक्रारीवरून मर्ग दाखल केलेला आहे. तर मृतक करुणा वानखडे हिच्या मृत्यूमुळे तिची दोन लेकरे पोरकी झाली आहेत. पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Previous Post Next Post