अमरावती येथे दि. १६/७/२०२२ ला सकाळी ठिक ८:३० वाजता क्षितिज पॅलेस रिंग रोड नवसारी अमरावती येथे अमरावती जिल्हा काँग्रेस समितीचे नव संकल्प शिबिराला सुरुवात झाली असता या शिबिरात जेष्ठ काॅगेस नेते उल्हासदादा पवार, माजी पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर, लोकेश शेवडे नाटककार, विचारवंत,संजय मिस्किन, राज कुलकर्णी, कुणालजी पाटील अमरावती जिल्हा अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, आमदार बळवंत भाऊ वानखडे, माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप हे होते. उल्हासदादा पवार यांनी अमरावती जिल्ह्य़ातील काॅगेस कार्यकर्ताना काॅगेस कसे समोर जाईल व ह्या साठी आपल्या काय करावे लागणार या बाबतीत मार्गदर्शन केले आहे. तसेच अमरावती जिल्हाचे माजी पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी पण त्यांच्या भाषणात चांगल्या प्रकारे कार्यकर्ताना मार्गदर्शन केले आहे.अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव संकल्प शिबिराला उपस्थिती म्हणून प्रकाश भारसाकळे, दयारामजी काळे, बाळासाहेब हिगणेकर, मोहोड भाऊ, तसेच अमरावती जिल्ह्य़ातील काॅगेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे नव संकल्प शिबीर सपंन्न...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
