बुलढाणा व अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे दिनांक 18 जुलै रोजी पुर्णा नदिला पूर आला असून येरळी माणेगाव या मार्गावरील पुर्णा नदिवर ब्रिटिश कालीन पुल पाण्याखाली गेल्यामुळे जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद झाला आहे.रात्रीपासूनच पावसाची संततधार चालू असून आज दिवसभरही पावसाची रिपरिप चालूच होती.त्यामुळे छोटेमोठे नदी नाले काठोकाठ भरून वाहत आहे.पुर्णा नदिचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगरातून झाला असून,त्या भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुर्णा नदिला पूर आला असून पुलावरून दोन ते तीन फुट पाणी वाहत आहे.पावसाच जोर असाच कायम राहिला तर पुर्णा नदिला मोठा पूर होण्याची दाट शक्यता आहे.पुराचे पाणी मोठ्या वेगात वाढत असून पूर्णा नदिचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.माणेगाव येरळीच्या मध्ये असलेला हा पुल ब्रिटिश कालीन असून 2006 मध्ये झालेल्या पुरात या पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला होता.त्यानंतर डागडुजी करून पुन्हा त्याच पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती...पुर्णा नदीवर दहा ते बारा वर्षापासून जीगाव प्रकल्पाचे काम चालू आहे.त्याचाच एक भाग म्हणून माणेगाव येथील पुर्णा नदिवर जुन्या पुलाच्या बाजूला नविन पुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.पण अजूनही पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे.स्थानिक आमदार,खासदार यांच्या राजकिय अभावामुळे पुलाचे कार्य अजूनही पुर्णत्वास गेले नाही...हा नवीन पुल जर पुर्ण झाला असता तर प्रवाशांचे हाल झाले नसते.पुलावरून पाणी असल्याने प्रवाशांना मोठे अंतर पार करत माहुली पुलावरून आणि धोपेश्वर येथुल पुलावरून जावे लागत आहे.नवीन पूल झाला असता तर प्रवाशांची अशी गैरसोय झाली नसती.त्यामुळे लवकरात लवकर हा नवीन पुल पुर्ण होणे गरजेचे आहे.
पुर्णा नदिला आलेल्या पुरामुळे जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद...तर नवीन पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने प्रवाशांचे होत आहेत हाल..
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत..
