अकोट येथील नरसिंग महाराज मंदिर येथे जेष्ठ शिवसैनिक सुरेश मामा बोंडे यांच्या हस्ते शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिर्घ आयुष्य लाभण्यारिता दुग्धाभिषेक व महाआरती ही बबनराव कुलकर्णी महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चार व विधीवत पूजा करण्यात आली.तसेच जेष्ठ शिवसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,महिला जिल्हा संघटिका प्रा.मायाताई म्हैसने,शहरप्रमुख सुनिल रंदे,उपजिल्हा संघटक विक्रम जायले,दिपक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.ग्रामीण रुग्णालय अकोट येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली गुजर यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.या प्रसंगी आदिवासी तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने,राहुल पाचडे,अतुल पांडे,नंदु कुलट,महिला उपजिल्हा संघटिका उषाताई गिरनाळे,तालुका संघटिका हर्षदा जायले,हेमलता सपकाळ,गोपाल कावरे,दिपक रेखाते,पंचायत समिती सदस्य सुरज गणभोज,, आदी शिवसैनिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवसेना माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोटमध्ये दुग्धाभिषेक...
अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल..
