बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांचे अतोनात पिकाचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांना तीबारा पेरणीची वेळ आली आहे. आजच्या घटीला शेतकऱ्याकडे पेरणी करता कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने पीडित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून शासनाने त्यांना त्वरित मोबदला द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांनी काल २९जुलै रोजी तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना या मागणीचे निवेदन दिलेले आहे. निविदांमध्ये नमूद आहे की या तालुक्यांमधील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीसह शेतीतील वाणी कीड, तसेच हरणांचे कळप यापासून खूप मोठे नुकसान झालेले आहे.जवळपास ७०%शेती उलटलेली आहे व शेतकऱ्यांना तीबार पेरणीची वेळ आली आहे.अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यामध्ये बुडालेली आहे.या सर्व कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्जबाजारी होऊन निराश झालेला आहे .तरीही शासनाने संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतींचे सर्व्हे करून पंचनामे करावे व प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे.निवेदन देताना युवा शेतकरी राहुल शिरसोले, गणेश वानखडे, तुषार सातव,अफसर कुरेशी, राजनकार सर, पांडुरंग इंगळे,प्रशांत गोसावी, शरद राजणकर, आनंद राजणकर, अभिजीत शिरसोले यांच्या सह संग्रामपूर येथील असंख्य शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
वाणी, कीटक तसेच हरणांचे कळपांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
