ग्रामीण भागातील नानाविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ग्रामीण पत्रकार करतो, अवैध धंदे असोत, किंवा शोषण असो अशा कोणत्याही लोकशाहीविरोधी कृत्याच्या बाबत ग्रामीण पत्रकार आपल्या लेखणीने त्यावर आवाज उठवतो, अशा वेळेस ग्रामीण पत्रकारांना देखील अनेक संकटाना सामोरे जावे लागते अशातच कधी कधी ग्रामीण पत्रकारावर दबाव वा हमले देखील केले जातात, परंतु याच पत्रकारांची एकजूट असली तर सहजा सहजी या पत्रकारांनाकडे कोणी वाकडी नजर देखील टाकू शकत नाही.नेमकी हिच गोष्ट हेरून पि. एल. सिरसाट यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली व आपले उभे आयुष्य ग्रामीण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी घालविले. अशा या जिद्दी करारी बाण्याच्या पत्रकाराचा २जून हा जन्मदिन संस्थापक अध्यक्ष पी एल शिरसाट यांची जयंती त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेल्हारा तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तेल्हारा कार्यालयात वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम पी एल शिरसाठ यांच्या प्रतिमेचे पूजन, हरार्पण महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार मा. महादेवराव वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू यांनी पि. एल. सिरसाट यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला व या लढावंय्या पत्रकारस त्रिवार अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव सुनील तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदू भाऊ नागपुरे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तेल्हारा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गवारगुरू, सचिव सुनील तायडे, उपाध्यक्ष महादेवराव वानखडे, दानापूर शाखेचे उपाध्यक्ष नंदू भाऊ नागपुरे, तालुका संघटक प्रा.विकास दामोदर, कोषध्यक्ष प्रविण वानखडे,गाव दर्पण न्यूज चे मुख्य संपादक विनोद रोजतकार, डॉक्टर पुरुषोत्तम सुशिर, सागर खराटे, प्रेमसागर वानखडे,विजय गवार गुरू इत्यादी उपस्थित होते.
वृक्षारोपणाने पि. एल. सिरसाट जयंती साजरी...
तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु...
