सुनगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निघालेल्या घोणस जातीच्या सापाला दिले जीवनदान...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

सुनगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिनांक 9 जुलै रोजी दुपारी अडीच वाजे दरम्यान गावातील काही महिला दर्शनाकरिता आल्या होत्या त्या महिलांना मंदिरामध्ये लावलेल्या स्टीलच्या गेटमध्ये एक साप आढळून आल्याने महिला पूर्णता गोंधळून गेल्या होत्या.त्या महिलांनी मंदिरा बाहेर येऊन तेथील नागरिकांना आवाज दिली असता, नागरिकांना मंदिराच्या आतील गाभाऱ्यात स्टील च्या गेटमध्ये साप असल्याचे दिसून आले.अतुल सातपुते या युवकाने दूरध्वनीवरून जळगाव जामोद येथील निसर्ग प्रेमी व सर्पमित्र शरद जाधव यांच्याशी संपर्क केला असता सर्पमित्र शरद जाधव हे जळगाव वरून सुनगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साप पकडण्याकरिता आले असता त्यांनी दुरूनच नागरिकांना सांगितले की सदर हा साप घोणस जातीचा असून तो विषारी सापांमध्ये गणल्या जातो. विषारी सापामध्ये हा साप दोन नंबर वर आहे.घोणस जातीच्या सापाने कोणाला चावा घेतल्यास त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठा तयार होऊन सदर व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे साप चावल्यास त्याच्यावर प्रथम उपचारासह रुग्णालयामध्ये त्वरित उपचार केल्याने सदर व्यक्ती वाचतो. हा साप पकडून एका भरणी मध्ये भरण्यात आला व त्या घोणस जातीच्या सर्पाला दूर जंगलामध्ये नेऊन सोडण्यात आले. सदर मंदिरातून साप पकडते वेळी सर्पमित्र शरद जाधव, पत्रकार अनिल भगत, अतुल सातपुते, विजय वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामा अंबडकार, लाईनमन सरदार, यासह देवदर्शनाकरिता आलेल्या महिला व असंख्य नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वांना सर्पमित्र शरद जाधव यांनी सापाला न मारता त्याला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याला जंगलात नेऊन सोडू तसेच सापा विषयी तेथील नागरिकांना मार्गदर्शन केले.

Previous Post Next Post