तेल्हारा तालुक्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुखांसोबतच...


तेल्हारा प्रतिनिधी/संघपाल गवारगुरु...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेची आढावा बैठक घेऊन शिवसैनिकांचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर करण्याचे आदेश विधानसभा संपर्क प्रमुख यांना देण्यात आला.त्या अनुषंगाने आज तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक स्थानिक विश्रामगृह येथे घेण्यात आली.या बैठकीमध्ये तेल्हारा तालुक्यातील व शहरातील सर्व शिवसैनिक,युवासैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत असून,पक्षाचे जेही आदेश असतील त्याची अंमलबजावणी करण्यात येईल शिवसेना पक्षासाठी पुन्हां दिवस रात्र एक करून पुन्हां सत्ता काबीज करू असा सूर शिवसैनिकांन मध्ये उमटत आहेत.आजच्या या शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय गावंडे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई वरून आलेले अकोट विधानसभा संपर्क प्रमुख ऋतुकांचन रसाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे माजी तालुका प्रमुख शंकरराव ताथोड उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शिवसेनेच अस्तिव व पक्षाचा इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती शिवसैनिकांपर्यंत पोहोचली व येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूकित जोमाने तयारी करू असे आशस्त केले या आढावा बैठकीला शिवसेना उपतालुका प्रमुख अजय गावंडे, गोपाल विखे, पुरुषोत्तम गावंडे, माजी शहर प्रमुख पप्पू सोनटक्के, युवासेना जिल्हाप्रवक्ते प्रा.सचिन थाटे, विवेक खारोडे, बंटी राऊत, बाळासाहेब निमकर्डे, विजय वारूळकर, अतुल घंगाळ, गजानन रेवस्कर, सतीश मोहोड, गजानन मोरखडे, गोलू राऊत, राहुल पुदाखे, विनोद शित्रे तशेच शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका वनिताताई वाकोडे,शहर संघटिका वैशालीताई इंगोले, किरणताई खाडे, प्रणिताताई कुकडे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.या आढावा बैठकीच प्रस्ताविक शिवसेना उपतालुकाप्रमुख अजय गावंडे तर आभार प्रदर्शन विवेक खारोडे यांनी केले.

Previous Post Next Post