तेल्हारा: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे चांगलवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गावात महिन्यातुन एकदा फक्त मासिक सभेला येत असल्याची गंभीर बाब समोर आली असून ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावाचा विकास खुंटला असल्याचे चित्र दिसून येत आहे.परिणामी गावात मुलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत असून विकास कामाअभावी नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे यामध्ये प्रामुख्याने सफाईकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते विशेषतः गावातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत केल्या जात नसल्याची सगळीकडे ओरडाओरड सुरू आहे.तसेच गावांमध्ये ट्रीट लाईट गेल्यास पंधरा दिवस ते एक महिना लाईट लावल्या जात नाही त्यामुळे नागरिकांना अंधारात फीरावे लागते तर गावात अनेक ठिकाणी पावसाळ्याच्या पाण्याचे डबके साचले असून यापासून डासांची उत्पत्ती होऊन गावात रोगराई पसरत असल्याने साथीचे आजार उद्भवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व घरकुल यादी अद्याप न लावल्याने पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यास अडचण येत आहे अश्या प्रकारच्या विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहेत परंतु चांगलवाडी ग्रामपंचायतचे सचिव याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक चर्चा करीत आहेत तरी संबंधित वरिष्ठांनी याबाबत लक्ष घालून ग्रामसेवकांना समज देऊन कर्तव्याची जाणीव करून द्यावी आणि गावाला भेटी देण्याच्या दिवसांचे भान ठेवून ग्रामपंचायतला हजर राहण्याचे बजावावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.
गावाचे ग्रामसेवक सुचविलेल्या दिवशी नियमित उपस्थित राहत नाहीत तसेच गावातील नागरिकांकडील थकीत कराची वसुली करत नसल्याने पैशा अभावी कामे करण्यास अडचण येत आहे कारण ग्रामपंचायतीकडे दुसरे उत्पन्नाचे स्त्रोत नसुन नाल्या सफाई गटारे भुजने पाणी पुरवठा दुरुस्ती व सार्वजनिक लाईट लावण्यास शासनाकडून कुठलाच निधी मिळत नाही कर वसुली करुण सर्व कामे करावी लागतात
कासुबाई शिवणकर , सरपंच ग्रा.पं.चांगलवाडी
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असून ग्रामसेवक वेळेवर कोणतेच काम करीत नाहीत कर वसुलीसाठी फीरत नाहीत मनमानी पद्धतीने काम करतात म्हणून गावात समस्याच वातावरण पुढे आले आहे याबाबत संबंधित वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा विचार आहे.
प्रदीप कडू, सदस्य ग्रा.पं. चांगलवाडी
