अमरावती जिल्हातिल तिवसा विधानसभा मतदारसंघ हा आमदार यशोमती ताई ठाकूर यांचा असुन तिवसा पचायत समिती वर एक हाती सत्ता कोगेंस पक्षाची आहे. यात अडीच वर्षांचा सभापती व उपसभापती पदाचा कार्यभार संपुष्टात आल्यानंतर उपसभापती पदाची निवडणूक झाली. यात वरखेड सर्कलच्या रोशनी मुकूंद नमस्कार पुनसे यांची सभागृहात एकमताने उपसभापती निवड झाली होती. मात्र सभापती पदाची निवडणूक न झाल्याने उपसभापती रोशनी पुनसे यांच्या कडे तात्पुरता सभापती पदाची पदभार देण्यात आला आहे. मात्र पुनसे ह्या अवघ्या २३ साव्या वर्षि सभापती झाल्याने सर्वात कमी वयाच्या सभापती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली,तिवसा पचायत समितीत आज दुपारी १ वाजता रोशनी पुनसे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यात पचायत समिती गटविकास अधिकारी चेतन जाधव यांनी पुनसे यांच्या कडे सभापती पदाचा पदभार दिला यावेळी तिवसा काॅगेसचे अध्यक्ष मुकूंद देशमुख, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप राव काळबांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव मोहरे, नगराध्यक्ष योगेश वानखडे असे प्रामुख्याने पदाधिकारी उपस्थित होते.
तिवसा पचायत समिती मध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी वयाची सभापती म्हणून रोशनी पुनसे..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
