प्रजा हीच राजा...!मी सेवेकरी....!माजी मंत्री आमदार कुटे यांचा मतदार संघात झंझावात दौरा...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

या उक्ती प्रमाणे काम करणारे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजयजी कुटे हे तब्बल एक महिन्यांनी मतदारसंघाचे यांचे काल आगमन झाले. राज्यातील नाट्यामय सत्तांतरात महत्वाची भुमीका बजावत असल्याने ते काही दिवस आपल्या मतदारसंघाच्या दूर होते. पण आल्या नंतर पहिल्याच दिवशी झंझावाती दौरा काढत दुःखाचा डोंगर कोसळले ल्या नागरींकाच्या भेटी साठी निघाले. व त्यांना तात्काळ शासकीय।मदत मिळाली की नाही याबाबत चौकशी  केली आणि मदत मिळवून दिली. यावेळी सावरगाव येथील सोनोने परिवारातील इंदूबाई ह्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या त्यांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच आजारी असलेले अशोक पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. अश्याच प्रकारे आसलगाव येथील मुळे परिवार, आडोळ येथील पंजाबराव उगले, निंभोरा येथील सागर दीघडे हा 27 वर्षीय युवक वीज पडून मृत्युमुखी यांच्या ही कुटुंबीयांना भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले.या अगोदर सकाळी शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दौऱ्याची सुरवात केली होती....

Previous Post Next Post