चिखलदरा तालुक्यातील अतिशय दुर्मिळ भागात असलेला गाव पाचडोगरी या गावात गुरुवारी दिवसी शंभर च्या जवळपास अशुद्ध पाणी पिल्याने येथिल पुरुष व महिलांना डायऱ्याची लागण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम यांनी mseb यांच्यासह इतर अधिकाऱ्यावर आरोप केला आहे. म्हटले गेले आहे की पावसाळ्यात mseb च्या कर्मचाऱ्यांनी वाटर सप्लाय ची लाईन कट केली नसती तर येथिल गावातील नागरिकांनी अशुद्ध पाणी पिले नसते. तसेच पावसाळ्यात आरोग्य सेवक तसेच ग्रामपंचायत चे सचिव व सरपंच यांचे काम होते की वाटर सप्लाय ची लाईन कट झाल्यावर गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी काही तरी तोडगा काढवे. परंतु असे काही झाले नसल्याने पाचडोगरी येथिल तिन व्यक्तींना त्याचे जिव गमावे लागले आहे.त्या करीता येथिल mseb डिपार्टमेंट कडून मरण पावलेले व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत करावी. अन्यथा mseb व इतर अधिकाऱ्या विरुद्ध उपोषणाला बसणार असल्याचे अमरावती जिल्हा परिषद मा. समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांचे म्हणणे आहे.
--खासदार नवनीत राणा व आमदार राजकुमार पटेल यांची भेट__
अमरावती जिल्हाचे खासदार नवनीत राणा व आमदार राजकुमार पटेल यांनी पाचडोगरी येथिल गावातील अशुद्ध असलेली विहिरची पाहणी केली आहे. तसेच गावातील नागरिकांशी चर्चा करून अमरावती जिल्हा परिषद सिओ पाडे साहेब यांना पाचडोगरी गावातील नागरिकांना लवकरात लवकर शुध्द पिण्याचे पाणी मिळावे असे सांगितले आहे.
