माळी समाज भूषण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद संपन्न...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळातर्फे श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर दरवर्षी प्रमाणे आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व समाज भूषण सत्कार सोहळा रविवार दिनांक 31 जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.हरिभाऊ इंगळे, डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, अँड.सौ.ज्योतीताई ढोकणे,मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ भोपळे,डॉ. नामदेवराव तानकार, रामदासजी वाकेकर, डॉ शेषराव भोपळे, वासुदेवराव भोपळ,पांडुरंग वेरूळकार,नितीनभाऊ सातव,अविनाशभाऊ उमरकर,सुनीलभाऊ येणकर,महादेवराव घुटे,डॉ.संदीप वाकेकर, उपस्थित होते. यावेळी माळी समाज भूषण सन्मानीय श्री.भिकाजी सुरडकर (महाराज) व सौ.देवकाबाई सुरडकर यांचा प्रशस्तिपत्र सन्मान चिन्ह,सिल्वर मेडल देऊन सात्पनिक सत्कार कृष्णरावजी इंगळे,उर्मिलाताई इंगळे, डाँ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केला.या प्रसंगी समाजातील 21 डॉक्टरसह सर्व प्रावीण्य प्राप्त 375 गुणवंतांचा सत्कार करण्यात येवून सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली तसेच जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व न.प.सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. स्वातीताई वाकेकर  समाजाच्या जडनघड़नित युवकांचे फार मोठे योगदान आहे असे गौरवउदगार काढलेत. तसेच अँड.ज्योतिताई ढोकणे यांनी गुणवंत विद्यार्थीनी उच्च गुणानुक्रमाने परिक्षा उतीर्ण केल्याबद्दल त्याचा गुणगौरव करून भावी जीवनबद्दल शुभेच्छा दिल्या.तसेच मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात भावी उज्वल जिवन जगत असताना स्पर्धेत आपण टिकण्यासाठी प्रयत्न करावे,तसेच विविध उद्योग करून समाजाची व आपली प्रगती साधावी यासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.शेषरावजी भोपळे यानी मार्गदर्शन करताना दहावी व बारावी नंतर उज्ज्वल भविष्य कोणत्या क्षेत्रात आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन अलकाताई निमकर्डे  यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकत्यानी अथक परिश्रम घतले..

Previous Post Next Post