अर्जून खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथे श्रावणमासच्या प्रथम सोमवारी गावातील स्थानिक मंडळांनी भव्य दिव्य मोठी कावड यात्रा काढली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कावडयात्रेत नदीचे जल आणून कावडयात्रा काढली या यात्रेत गावातील तीन मंडळांनी शोभा वाढवली यामध्ये महाकालेश्वर मित्र मंडळ चंडिका चौक, मिलींद नगर शैलेशकॉलनी हिवरखेड येथे शिव भक्तांचा समावेश आहे, तर श्रीरामसेना कावळयात्रा मोठे बारगण, जय भोले मित्र मंडळ देवळीवेस अशा मोठया ३ मंडळानि शिवलीग, महादेव, श्रीरामसीता यांच्या मूर्ती कावडवर विराजमान करून गावातील सोनवाडी फाटा ते सदाशिव संस्थान पर्यत शोभायात्रा काढली ,या यात्रेतचे गावात ठीक ठिकाणी महिला पुरुषांनि स्वागत केले, तर काही भाविक सामाजिक कार्यकर्त्यांनी कावडधारी यांना फराळ पाणी व लाडूचे वितरण करण्यात आले,कावडयात्रेत हिवरखेड पोलिसांचा चोख बंदोबस्त होता,
