जि प कें म प्रा शाळा वडशिंगी येथे दहीहंडी उत्सव संपन्न. वर्ग 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी साकारला 3 थरांचा मनोरा...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

आज दिनांक 19 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांनी 3 थरांची दहीहंडी साकारली.विशेष म्हणजे 3 थरांचा मनोरा हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्वतंत्रपणे साकारला.आजच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री जावरकर साहेब स्वतः उपस्थित होते.साहेबांनी स्वतः गोविंदा पथकांच्या सोबत आनंदाने गाण्यावर ठेका धरला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.विद्यार्थी कृष्णाच्या वेशात आणि विद्यार्थीनी राधेच्या आणि गावळणीच्या वेशात एकत्रित गोविंदा पथकासमवेत सामूहिक नृत्य करून उपस्थित्यांची मने जिंकली.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सोळंके सर यांनी जावरकर साहेबांचे स्वागत केले.या दहीहंडीच्या कार्यक्रमाला शा व्य समिती च्या अध्यक्षा सौ निलादेवी मानकर,सदस्य बळीराम रहाटे, रामेश्वर मानकर,बचत गटाच्या प्रेरक सौ शालिनीताई वानखडे आणि त्यांच्या सर्व महिला, गावातील विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक उपस्थित होते.

Previous Post Next Post