मागील दोन वर्षापासून कोरोनाच संकट असल्यामुळे दहीहंडी उत्सव हा सार्वजनिक प्रमाणात आपण साजरा करू शकलो नव्हतो तरी यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता सातपुडा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात संस्थेचे अध्यक्ष मा आ कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आलायावेळी दहीहंडी उत्सवाचे उद्घाटक म्हणून जळगाव जामोद च्या उपविभागीय अधिकारी सौ वैशाली देवकर तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जामोद नगरीचे ठाणेदार सुनीलजी आंबुलकर साहेब उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रा श्री भाऊसाहेब इंगळे संस्थेचे सचिव डॉ श्री एस एन भोपळे संचालक रामदासजी वाकेकर संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ सौ स्वाती वाकेकर तसेच सौ. गौरीताई सातव उपस्थित होत्या.यावेळी बालगोपाल कृष्ण व राधेच्या वेष्यात नटून - थटून आले होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोहक असे नृत्य सादर केले. सोबतच लहान मोठ्या विद्यार्थ्यांनी मनोरे लावत दहीहंडीचा उत्सव साजरा आनंद घेतला. यावेळी लहान बालगोपाळांनी दहीहंडी आला रे आला गोविंदा च्या जयघोषात दहीहंडी फोडली व यावेळी मान्यवरांनी चिमुकल्यांना प्रोत्साहन पण मार्गदर्शन देताना सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उत्साहात साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या सर ते शेवटी कालाचा प्रसादाचा वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सातपुडा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
