अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी,
हिवरखेड येथे ठिक ठिकाणीं दहीहांडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला, तसेच चंडिका चौकात राहणाऱ्या बऱ्याच नागरिकांनच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माअष्टमी साजरी करून महाप्रसाद वितरण करण्यात आला,तर गोपाळकाल्याच्या दिवशी स्थानिक चंडिका चौकात तेथील गोपालांनि लय भारी आकर्षक दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला,येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी व उपस्थित भाविकांनि दहीहांडी पाहण्यासाठी एकच गर्दी केली, तसेच गावातील मोठा महादेव संस्थान, कार्लीवेश, इंदिरा नगर, मातंग पुरा,आधी विविध ठिकाणी व बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये दहींहांडी उत्सव गोपालांनि साजरा केला, बालगोपालांनि सुद्धा आनंद घेतला, महिला,पुरुष मंडळांनी दहीहंडी पाहण्यासाठी उत्सुकताने हजेरी लावली होती,हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता,
