जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील शिवम ज्ञानेश्वर भगत हा 21 वर्षीय युवक आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरी कोणाला काही न सांगता निघून गेला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासह गावकरी शिवम याचा शोध सर्वत्र घेत असून. तर यासह शिवम च्या कुटुंबातील सदस्यांनी शिवम घरी ये जिथे कुठेही असेल तेथून परत घरी ये अशी आर्त हाक मारत आहेत. शिवम जेथे कुठे असेल शिवम ने परत यावे तसेच वरील फोटोमध्ये दिसत असणारा शिवम भगत हा कोणालाही आढळल्यास त्यांनी पोलीस स्टेशन यासह त्याचे वडील ज्ञानेश्वर भगत मोबाईल नंबर 99 75 96 82 25 व रमेश बानाईत यांचा मोबाईल नंबर 99 75 18 70 07 या क्रमांकावर कॉल करून माहिती द्या असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले.
