चारबन येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा...


जळगांव जा.प्रतिनिधी:-मंगल काकडे.

जळगांव जामोद तालुक्यातील दुर्गम,आदिवासी भागातील चारबन येथे स्वातंत्र्याचा अमृतोत्सव व जागतिक आदिवासी दिन आनंदात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व गावकाऱ्यांसोबत आदिवासी ढोलावर नृत्य करीत कार्यक्रमाची रंगत वाढविली.सुरुवातीला गावातून तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली यावेळी चारबन च्या विद्यार्थ्यांचा आदिवासी पोशाख सर्वांच्या नजरेत भरत होता.कार्यक्रमातील गावकऱ्यांचा सहभाग बघता जळगांव जा च्या उपविभागीय अधिकारी  वैशाली देवकर,तहसीलदार शीतल सोलाट ,गटविकास अधीकारी शिवशंकर भारसाकळे यांनी सुद्धा आदिवासी ढोल वाजवीत नृत्याचा फेर धरला त्यांच्या सोबत गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके ,विस्तार अधिकारी संदीप मोरे ,सन्मान चे श्याम फाफट ,केशरसिंग राऊत सर,ग्रामसेवक अनिल अंबडकर,शिक्षक गोवर्धन दांडगे,दीपक उमाळे,ममता गावित,उदयसिंग पटेल व गावकऱ्यांनी सुद्धा ढोलाच्या तालावर नृत्य केले.भारत माता की जय,घर घर तिरंगा च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.प्रभातफेरीची सांगता जिल्हा परिषद शाळा चारबन येथे झाली व आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.यावेळी सन्मान टीम च्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षेचे साहित्य पूरविण्यात आले.शेवटी उत्कृष्ट नियोजना बद्दल चारबन शाळेचे शिक्षक वृंद व उमापूर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.संचालन दीपक उमाळे सर तर आभार ग्रामसेवक अनिल अंबडकार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चारबन च्या गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post Next Post