हिवरखेड नजीक असलेल्या कार्ला बु या मुख्य मार्गावर, ज्या मार्गावरून गावात करावा लागतो प्रवेश अशा मुख्य मार्गावर, घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहकच दुर्गंधीचा त्रास सहनकरून घ्या लागत आहे, या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थ्यांनच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे, या रस्त्यावरून गावात जाताना दुर्गंधीने प्रवाशांनचे स्वागत होत असल्याचे प्रवाशी बोलत आहेत, या रस्त्यावर गावातील काही महाशये पहाटे पहाटे सौचालय करत असल्याने व हा मार्गावर शेंन खत,मातीचे ढिगार सांडपाणी साचल्याने अधिक घाण कचरा निर्माण होतो, संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेऊन गावात हर घर सौचालय मोहीम राबवायला हवी व नियोजन सुद्धा करावे, ग्रामपंचायतने बांधून दिलेल्या सौचालयाचा उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांनि सुद्धा लाभ घायला हवा , असे नियोजन केल्यावर येथील घाणकचऱ्याची विल्हेवाट लागू शकते, असे मत त्रस्त नागरिक व्यक्त करीत आहेत,या रस्त्यावरच एकीकडे ग्रामपंचायतने फलक लावले हे गाव हागनदारी मुक्त आहे, व दुसरीकडे याचं फलक जवळ काही उघड्यावर सौचालयावर बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे,असेच जर चालत राहिले तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, या गंभीर बाबीकडे संबंधीत वरिष्ठांनि लक्ष देऊन या दुर्गंधीची विल्हेवाट लावावी अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत,
प्रतिक्रिया,
ग्रामपंचायतने महिलांन करिता सौचालय बांधून दिले आहे,त्या सौचालयाचा वापर करावा,
नंदलाल भराटे
(सरपंच कार्ला बु)
ग्रामपंचायतने आम्हा महिलांन करिता सौचालय बांधलेले आहेत,परंतु त्या सौचालयाकडे जाताना तारेवरची कसरत करून जावे लागते, व त्या सौचालयात वापरण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्थानाही आम्ही कसा त्या सौचालयाचा वापर करू,
कार्ला बु येथील त्रस्त महिला नागरिक,)
