भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव यांच्या अंतर्गत दिनांक आठ ऑगस्ट ते 17 ऑगस्ट च्या विविध उपक्रमांच्या जनजागृतीसाठी जळगाव जामोद पंचायत समितीने तालुक्यात प्रचार रथाची सुरुवात केली असून. प्रचार रथाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे व विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची गावोगावी प्रसिद्धी व्हावी व प्रत्येक घरावर ध्वज उभारणी होऊन देशाप्रती असलेला आपला सद्भाव प्रकट व्हावा यासाठी पंचायत समिती स्तरावरून तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रसिद्धीसाठी प्रचाराथाची सुरुवात करण्यात आली. प्रचारार्थाची सुरुवात दिनांक 5 ऑगस्ट पासून पंचायत समिती जळगाव जामोद येथून करण्यात आली. यावेळी विविध संघटना यांच्यासह सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी या प्रचाराचा शुभारंभास उपस्थित होते. यावेळी सरपंच संघटनेचे राजू शित्रे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक संघटने सर्व ग्रामसेवक यांनी वंदे मातरम भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरायू हो या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे विस्ताराधिकारी संदीप मोरे विस्तार अधिकारी राजपूत यांनी गाव पातळीवर प्रसिद्धीसाठी बॅनर प्रत्येक व्यक्तीसाठी पोम्प्लेट चे वितरण करून सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात पंचायत समितीच्या प्रचार रथाने.. गटविकास अधिकारी भारसाकडे विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी दाखवली हिरवी झेंडी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
