जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रावण घुले यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गव्हाळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पदोन्नती केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 92 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती करण्यात आली. यामध्ये जळगाव जामोद येथील तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची यामध्ये पदोन्नती केली. पदोन्नती मिळाल्याची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेल्या तीनही अधिकाऱ्यांचे जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन तीनही अधिकाऱ्यांचा सन्मान केला.. सदर सन्मान सोहळ्यामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस उपनिरीक्षक घोडेस्वार, पोलीस उपनिरीक्षक सरकटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय राऊत, पोलीस नाईक सय्यद तय्यब अली, पोलीस नाईक अनिल सुशील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश निंबोळकार, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भारती,पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस नाईक इरफान शेख, यांच्यासह पत्रकार अनिल भगत यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post Next Post