--------------------------------
मेळघाटच्या सर्व आदिवासी आश्रम शाळेवर प्रकल्प कार्यालय धारणी मेहरबान दिसत आहे. अधिकाऱ्याने कितीही भ्रस्टाचार केले तरीही त्यांना कसलीही भीति नाही. कारण आदिवासी विभागाने त्यांचा काळा बाजाराला आळा घालण्याएवजी त्यांना क्षय दिले आहे .पण त्यांचा या कृत्यामुळे आदिवासी मुलांचे जीवन धोक्यात येत आहे. गेल्या काही वर्षानी आदिवासी मुलांचे किंवा मुलींना शाळेत आपले प्राण हि गमवावे लागले आहे. शनिवार च्या दिवशी अचानक ४० मुलींना व ३ मुलांना दोन एम्बुलेंस मध्ये चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. एकासोबत एवढ्या मुला - मुलींना कसासाठी आणले हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे युवा स्वाभिमान पार्टी चे तालुका अध्यक्ष राजेश वर्मा व पदाधिकारी यांना हि बाब कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दासरवार सर यांचाशी भेट घेतली व सत्य परिस्थिती काय ते जानून घेतले, दूषित पाण्यामुळे वायरल इन्फेक्शन झाले आहे, घाबरण्या सारखी कोणतीही बाब नाही त्यांना औषधें देण्यात आली आहे दोन ते तीन दिवसात परिस्थिती आटोक्यात येईल. फक्त मुलांना स्वच्छ पाणी पिण्याकरिता देण्यास सांगितले. नंतर जारीदा आश्रम शाळेतील समस्या जानून घेण्यासाठी युवा स्वाभिमान चे राष्ट्रीय मार्गदर्शक सुनील भाऊ राणा, तालुका अध्यक्ष राजेश वर्मा , सुनील बिलवे, मोहन बिसंदरे, सुधीर पांडे, निलेश उइके, सुखदेव भाऊ आंबेडकर हे गेले असता व मुलांसोबत संवाद केले असता, मुलींनी आम्हाला चांगल्या प्रकारे व पोटभर जेवन मिळत नाही. त्यामुळे आमच्या प्रकृतीस धोका निर्माण होऊ शकतो, आम्हाला हे त्यांनी सांगितले. मेनू चार्ट वर ज्या प्रमाणे पुरवठा ची लिस्ट आहे त्याप्रमाने आम्हाला व्यवस्थित जेवण मिळत नाही. नास्ता मधून दूध, अंडे, केळी गायब मात्र रोजच्या दैनंदिन चार्टवर अन्डे, दूध, केळी लिहिले आहे. मात्र एक वर्षा पासून मुलांना हे मिळालेच नाही. पुरवठा याची पाहणी केली असता अत्यंत निस्कृस्ट दर्जाचे पुरवठा दिसून आले. फुल गोबी हे सडलेल्या परिस्थितीत दिसले. त्यामध्ये अळी आढळुन आली. अधीक्षक राहुल काने मात्र गायब प्रभारी अधीक्षक सरोदे सर यांना विचारले तर त्यांनी पण गोलमोल उत्तर दिले. आणी शेवटी त्यांनी कबूल केले की माझ्याकडे तोंडी चार्ज आहे. आणी हे जे प्रकार आहे याची मला काहीही जाणीव नाही. आणी शाळेतील मुलांची तीन वर्षांपासून DBT आलेली नाही. आता अस वाटत आहे की आदिवासी विभागाला आदिवासी मुलांचा जीवाशी काही घेणं देण नाही फक्त त्यांना शासनाचा फुकटचा पगार घेत असल्याचा दिसून येत आहे. प्रकल्प ऑफिस झोपेच्या अवस्थेत आहे. त्यांना आदिवासी मुलांच्या प्रकृतीशी काही ही घेणं देण नाही. या अगोदर ही अधीक्षक राहुल काने यांच्यावर मुलांकडे दुर्लक्ष व हिटलर शाही पद्धतीने वागण्याचा मुलांकडून व काही सामाजिक संघटनेतुन आरोप होता. तरीही या भ्रस्ट अधिकाऱ्याची कोणतेही प्रकारची चौकशी झालेली नाही.अजून ही हा अधिकारी आपल्या मनमानी प्रमाणे वागत आहे. बरोबर ड्युटी करत नाही. कंत्राटी मंजूर वर्ग जे आहे त्यांच्याकडे चाबी देऊन देतो आणी गायब राहतो. आदिवासी मुलांचा जीव गेल्यानंतर तुम्ही या अधिकाऱ्यावर कारवाही करणार का ? अशा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा हिटलर शाही अधिकारी वर योग्य ते कारवाही करू व आदिवासी मुलांची जे समस्या आहे ते खासदार नवनीत राणा मॅडम यांचा कडून संसदेत मांडू व जे खासदार निधीतून खर्च लागेल ते आम्ही आदिवासी मुलांचा हितासाठी खर्च करू व संबंधित अधिकारी यांच्यावर सखोल चौकशी करून योग्य ती कारवाही करू असे युवा स्वाभिमान पार्टी चे राष्ट्रीय मार्गदर्शक सुनील भाऊ राणा, तालुका अध्यक्ष राजेश वर्मा, व पदाधिकारी यांनी जारिदा आश्रम शाळेतील मुलांना आश्वासन दिले..
