आस्की किड्स पब्लीक स्कुल येथे "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" थाटामाटात साजरा...


सैय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...

आज देशभरात आनंदोत्सव साजरा होत असताना अकोट शहरातील अग्रणी आस्की किड्स पब्लीक स्कुल येथे  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संस्थेचे अध्यक्ष मिलींदजी झाडे व  आमदार प्रकाशजी भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला. प्रमुख अतीथी म्हणुन डॉ. विठ्ठलराव राऊत, माजी सैनिक सुभाषजी देवगीरे, जयकृष्णजी वाकोडे, महादेवरावजी चवरे, श्रीकृष्णजी वावगे, राजेशजी रावणकार, भूलतज्ञ डॉ. चैतन्यजी अंबळकर यांची सपत्नीक उपस्थीती लाभली.
कार्यक्रमाची सुरूवात स्वातंत्र सैनिकांच्या प्रतीमापुजन व ध्वजारोहण करून झाली. विद्यार्थ्यांनी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट  असे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले. गायन, नृत्य, स्काऊट व गाईड ड्रिल, बँड पथक हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. दिशा निलेश भिरडे व कशफीया कश्यफ तर आभार परनील  मोडशे याने मानले.स्वागताध्यक्ष म्हणुन संस्थेचे सचीव नितीनजी झाडे तर आयोजनाची जबाबदारी मुख्याध्यापीका नेहा झाडे, प्री-स्कुल मुख्याध्यापीका सुषमा झाडे, संगीता बाळापुरे, पर्यव्यक्षक पवन चितोडे, आशीष पवार, अमीत हाडोळे, राहुल पालेकर, सुरज जायले व संपूर्ण शिक्षकवृंदांनी पाहीली. 

--प्रतिक्रिया--
भविष्याची भक्कम पायाभरणी दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास व उद्यमशीलतेतुनच शक्य आहे. त्यासाठी समाजाच्या अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण, संस्कार व उत्तम आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल : आमदार प्रकाशजी भारसाकळे. 

--प्रतिक्रिया--
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीचा आरसा असुन, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत आपण वैश्वीक महासत्ता बनण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहे. : अध्यक्ष मिलींदजी झाडे

Previous Post Next Post