वडशिंगी येथील पंचशील नगर रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण...


जळगांव जा प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथील पंचशील नगरातील दलित वस्तीतील रस्त्याबाबत जळगाव जामोद पंचायत समिती समोर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंचशील नगरा मधील नामदेव बाबुराव गवई,बाबुराव चोपडे,शोभाबाई प्रभाकर भगत,केसरबाई रामदास भगत यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. वडशिंगी येथील पंचशील नगरा मधील दलित वस्तीच्या रस्त्याचा प्रश्न 2019 पासून प्रलंबित आहे या रस्त्यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासन तसेच पंचायत समितीला सुद्धा निवेदने दिली.परंतु सदर रस्ता दलित वस्तीमध्ये येत असून त्या रस्त्याला ग्रामपंचायत प्रशासन हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहेत असा येथील नागरिकांनी आरोप केला आहे. दरवर्षी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखोचा निधी येत असून हा निधी सदर ग्रामपंचायत इतरत्र खर्च करीत असते. सदर रस्ता दलित वस्तीत असल्यामुळे दलित वस्तीचा निधी या रस्त्यासाठी वापरावा जेणेकरून या नागरिकांची समस्या निकाली निघेल परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सदर ग्रामपंचायत हा निधी या रस्त्यासाठी वापरत नाही परिणामी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात चिखलामधून ये जा करावी लागते लागते. पंचशील नगरातील रस्त्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावून येथील नागरिकांना न्याय द्यावा यासाठी येथील काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या नागरिकांनी पंचायत समिती समोरच उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, यासह शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे.

Previous Post Next Post