----------------------------------------
धारणी तालुका अंतर्गत चीचघाट येथील कविता राजेश जावरकर गर्भवती मातेला गावातील आशा वर्कर निर्मला धांडे ने सोनोग्राफी करीता रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दिनांक ६ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी १० च्या सुमारास घेऊन गेली असता. डॉक्टर प्रीती सेंद्रे आपल्या प्रायव्हेट आरोग्य रुग्णालयातून येईल पर्यंत गर्भवती माता कविता राजेश जावरकर यांना उपाशी दुपारी ४ वाजे पर्यंत बसवून ठेवण्यात आले. आणि सोनोग्राफी च्या वेळेस गर्भवती माता कविता जावरकर आणि आशा वर्कर निर्मला धांडे यांना मुलं बाळ किती आहे याची विचारणा करण्यात आली. सदर महिलेने आणि आशा वर्कर ने दिलेल्या उत्तरावर डॉक्टर प्रीती शेंद्रे यांच्या द्वारे ढोर जानवर जैसे बच्चे पैदा करना असे अपशब्द बोलून त्यांचा अपमान केल्याची घटना घडली आहे. ह्या घटनेने गर्भवती महिलेचे मन दु:खावले गेले. डॉक्टर प्रीती शेंद्रे उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे कार्यरत असुन यांचे धारणी शहरात स्वतःचे प्राइवेट आरोग्यम रुग्णालय बुलढाना बँक च्या वर असुन तिथे वेळ दिल्यामुळे तालुक्यातील अनेक रुग्णाचे हाल होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर तालुक्यातील गर्भवती महिलांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी करिता सकाळी १० वाजता बोलाऊन दुपारी ४ पर्यंत उपाशी बसून ठेवण्यात आले. सदर कर्मचारी शासनाकडून रुग्णाची सेवा देण्याकरिता पूर्ण पगार घेऊन सुद्धा वेळ देत नाही अशी परिस्थिती नागरिकांना दिसून येत आहे. सदर गर्भवती माता कविता जावरकर यांच्या प्रतिक्रिया वरुन भविष्यात कोणत्याही परिस्थितीत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार नाही आणि परिवारातील कोणत्याही व्यक्तीला किंवा मुलं बाळांना सुद्धा घेऊन येणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. मेळघाटात आदिवासी बहुल व अज्ञानी अशिक्षित लोंकान मध्ये एका सुशिक्षित महिला डाक्टर कडुन गर्भवती महिलांना अशी अशभ्य व गैरजवाबदार वागणूक मिळत असेल तर रुग्ण व गर्भवती महिला शासकीय रुग्णालयात उपचारा पासुन दुर राहतील. ही मेळघाटासाठी शोकांतिका आहे.
