रुग्णवाहिकेचा चालक ठरला गरोदर मातेसाठी देवदूत..भिलखेडा येथील महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना, अन रस्त्यावर पर्यटकांची तोबा गर्दी...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....

मेळघाटच्या सलोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक गरोदर मातेसाठी देवदूत ठरला आहे भिलखेडा येथील सामोरी दिनेश सावलकर या गरोदर महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना होऊ लागल्या परिणामी तातडीने रुग्णवाहिका गरोदर मातेच्या घरी पोहचली मातेला घेऊन अचलपूरकडे निघाली मात्र चिखलदऱ्याच्या घाटात पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच रांगा असल्याने रुग्णवाहिका काढायला मोठा त्रास होत होता मात्र रुग्णवाहिका चालक राजेश कासदेकर गरोदर यांनी मातेला वेळेत उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेला सुरळीतपणे गर्दीतून वाट काढत गरोदर मातेला रुग्णालयात पोहचवलं वेळेत रुग्णालयात पोहचल्याने त्या मातेवर उपचार सुरू झाले चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या भिलखेडा गावात गरोदर माता सामोरी दिनेश सावलकरला आठव्या महिन्यातच प्रसूती कळा सुरू झाल्याचा फोन मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांना आला त्यांनी तात्काळ सलोना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आदित्य पाटील व आरोग्य सुपरवायझर सौ लकडे यांना रुग्णवाहिकेसाठी फोन केला त्यांनी सुद्धा लगेच रुग्णवाहिका पाठवली इकडे महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना सुरू होत्या अश्यातच रुग्णवाहिका गावात पोहचली अन मातेला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाली मात्र रविवार दिवस असल्याने चिखलदऱ्याच्या घाटात मोठया प्रमाणात पर्यटकांच्या वाहनांची संख्या होती त्यामुळे की काय रुग्णवाहिका बाहेर काढणे चालकाला कठीण जात होते.मात्र पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीत अडकलेली रुग्णवाहिका मोठ्याने सायरन वाजवते मात्र वाहनांची गर्दी आपल्याच नादात पुढे सरकते असा काहीसा अनुभव नेहमीच अनुभवाला मिळते मात्र रविवारची पर्यटकवारी त्याला अपवाद ठरली आणि गर्दीतील माणुसकी दिसून आली रुग्णवाहिका चालक राजेश कासदेकर यांनी सुद्धा धाडस दाखवत गर्द्दीतुन गरोदर मातेला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहचवलं गरोदर मातेला वेळेत रुग्णालयात पोहचल्याने त्या मातेवर उपचार सुरू करण्यात आले सध्या ती माता अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.यासाठी रुग्णवाहिका चालक राजेश कासदेकर यांच्यासहमोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले,आरोग्य सेविका हिना सौदागर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.....

-------/////---------

रुग्णवाहिकेत गरोदर माता असल्याची माहिती मिळताच पर्यटकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिकेला गर्दीने वाट करून दिली मात्र रस्ता अरुंद आणि वाहनांची संख्या खूप जास्त असल्याने वाहन सुखरूप बाहेर काढने कठीण जात होते मात्र चालकामुळे ते शक्य झाले  आणि आम्ही वेळेत हॉस्पिटलला पोहोचलो अन त्या गरोदर मातेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिच्यावर उपचार सुरु झाले:- डॉ.नीता नागले वैद्यकीय अधिकारी, मोथा

Previous Post Next Post