काजेगांव ग्रामपंचायत समोर सामूहिक राष्ट्रगीत चालू होताच अंत्यविधीसाठी जाणारी अंत्ययात्रा जागेवर थांबली व केले राष्ट्रगीत सुरु...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे  उपक्रमानुसार "स्वराज महोत्सव" अंतर्गत "समुह राष्ट्रगीत गायन" चा कार्यक्रम दि. १७/०८/२०२२ रोजी  शासना द्वारे आपण असाल त्या ठिकाणी सकाळी ठीक ११.०० राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रगीता विषयी आपला आदर व्यक्त  करण्यात यावा असे निर्देश होते.त्यातच दिनांक १६/८/२०२२ रोजी गावातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्या, माजी ग्राम पंचायत सदस्या स्वर्गीय सुमनबाई काशीराम बोरणारे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. दिनांक 17 तारखेला त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा ग्रामपंचायतच्या दरम्यान अकरा वाजता पोहोचली तेव्हा सरपंच पती सुहास वाघ यांनी राष्ट्रगीत गायनाची वेळ झाली असल्याचे गावकऱ्यांना लक्षात आणून दिले यावेळेस गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोहर पाटील वाघ,डॉ. अशोक शेजोळे, बंडू पाटील. दादारावजी धदंर, विनायकराव खारोडे तसेच गावातील इतर नागरिक बोरणारे परिवार व उपस्थित अंत्ययात्रेला उपस्थित असलेले पाहुणे यांनी सर्वांन्मते निर्णय घेऊन अंतयात्रा ग्रामपंचायत समोर ठेवून थांबून राष्ट्रगीत घेण्यात आले.स्वर्गीय सुमनबाई बोरणारे यांना राष्ट्रगीता विषयी व विषयी नेहमीच आदर होता त्या मागील कित्येक वर्षापासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला न चुकता झेंडावंदकरिता शाळेत किंवा ग्रामपंचायतला हजर राहायच्या व स्वयंपूर्ण राष्ट्रीय सण साजरा करायचा तसेच लहान बालगोपाळांना साहित्य व खाऊ  देऊन इतिहासाबद्दल माहिती सुद्धा द्यायच्या तसेच त्यांना लेखनाची वाचनाची तसेच कविता व गीत लिखाणाची , गायनाची आवड होती. आज त्यांच्यामागे ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप बोरणारे व त्यांचे इतर तीन मुले व दोन मुली नातवंडे असा खूप मोठा आप्त परिवार आहे.आज काजेगाव  वासियांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून दिलेली  श्रद्धांजली हे खरंच आगळीवेगळी श्रद्धांजली आहे.

Previous Post Next Post