गोकुळाष्टमीनिमित्त गौरक्षण संस्थेच्या श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन..आकर्षक विद्युत रोषणाईने सजले श्रीकृष्ण मंदिर..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णचा जन्म दिवस.श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी गोकुळाष्टमी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.गोकुळाष्टमीश्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या उदरी कृष्णाचा जन्म होताच वसुदेवाने कंसभयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंदयशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदीआनंद झाला.दहीहंडी या दिवशी उपवास करतात. रात्री मंदिरातून जन्मोत्सव आणि कथाकीर्तने होतात.गोकुळाष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जळगाव शहरातील गोरक्षण संस्था मधील श्रीकृष्ण मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केल्या गेला. यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण मंदिर हे विद्युत रोषणाईने  आकर्षक सजवले होते. काल रात्री गोकुळ अष्टमीनिमित्त मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री बारानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात उपस्थित भक्तांनी जल्लोष करून साजरा केला. यावेळी संस्थांचे अध्यक्ष सुरेश मोदी हे सुद्धा उपस्थित होते.आज सकाळी काल्याचे किर्तन होऊन दहीहंडी कार्यक्रम केल्यानंतर आज रात्रीला सुद्धा मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post