जळगाव जामोद शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक तीन येथे दिनांक 17 ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रम संपन्न झाला तसेच दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त विविध उपक्रमा चा शेवटचा टप्पा म्हणजे "सामूहिक राष्ट्रगीत" गायन जळगाव जामोद नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या'श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी शाळा क्रमांक ३. येथे दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00. वाजता सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम संपन्न झाला.. सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार मॅडम, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी, ठाणेदार,विस्तार अधिकारी... सर्व नगरपरिषद व पंचायत समिती मान्यवर, नगरपरिषद शाळा विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान चित्रकला रांगोळी व निबंध स्पर्धा मधील प्रथम, द्वितीय ,व तृतीय क्रमांक पटकावणारे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले...मतदार यादी आधार लींकिगचे पर्यवेक्षक म्हणुन काम उत्कृष्ट केल्यामुळे अनिल भड या अधिकाऱ्याचे उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक तीन च्या वतीने सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
