१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्व.अक्काबाई धोपेश्वरकर शिशु मंदिर येथे ध्वजारोहण...


जळगांव जा.तालुका प्रतिनिधी...

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले असून या 15 ऑगस्ट ला सकाळी साडेसात वाजता स्व.अक्काबाई धोपेश्वरकर शिशु मंदिर जळगाव जामोद येथे ध्वजारोहण करून राष्ट्रीय गीत म्हणण्यात आले झेंडावंदनला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते दिनांक १४ रोजी मुलांची चित्रकला स्पर्धा कार्यक्रम घेऊन त्यांना  खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मंडळाच्या संचालिका सौ मधूस्मिता जोशी यांनी पुढाकार घेतला तसेच बक्षीस वितरण चा कार्यक्रम संपन्न झाला . शाळेतील लहान मुलांनी बलसागर भारत होवो हे  सामूहिक गीत छानपणे  सादर केले काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण दिले या कार्यक्रमाला महिला मंडळ चे अध्यक्ष सर्व कार्यकारिणी मंडळ भर पाऊस चालू असतानाही सर्वांची उपस्थिती होते.मुलांना कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ  देण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका तसेच मावशी यांच्या सहकार्याने  कार्यक्रम छान पणे पार पडला.यावेळी स्व.अक्काबाई धोपेश्वरकर शिशु मंदिर जळगाव जामोद शाळेमधील सर्व शिक्षिका सुमतीताई पाटिल, प्रिया ताडे ,मुग्धा माळपांडे, सविता पांडव ,सुजाता येवूल , मालती परीहार, यांची उपस्थित होते

Previous Post Next Post