राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत सेमाडोह येथील मतिमंद मुली वर रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणी नसताना तिला जंगलाकडे पुनर्वसन पिली गावाजवळ नेऊन जंगलात जबरदस्तीने बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली मतिमंद मुलगी ही सेमाडोह येथील रहिवासी असून बलात्कार करणारे आरोपी धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील कारा, नांदुरी या गावातील आहेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिडीत मुलगी ही मतिमंद असल्याने ती रस्त्यावर फिरत असते मुलीचे वय वीस वर्षे असल्याची ही माहिती आहे रात्री वेळी11 वाजता, (करा) येथील युवक सुक्राम नानकराम धांडे वय तीस वर्ष सुनील दहिकर वय तीस वर्ष दोघेही वीट भट्टी च्या कामा निमित्त परतवाडा येथून पैसे घेऊन घरी जात असताना त्यांना ही मुलगी रस्त्यात आढळून आली तिने हात दाखवून या मुलांना मदत मागितली असता या दोघांनी तिला जंगला कडे पिली गावा जवळ नेऊन इलेक्ट्रिक डीपीच्या बाजूला तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.सेमाडोह येथील सामाजिक कार्यकर्ते शिवा गजानन काकड हे फोर व्हीलर वाहनाने घरी जात असताना त्यांना संशय आल्याने ते गाडीतून उतरून पहात असताना त्यांनाही घटना दिसून आली व त्यांनी त्या मुलीला ओळखून दोन्ही आरोपींना सेमाडोह येथे पकडून आणले..घटनेची माहिती मुलीच्या भावाने चिखलदरा पोलीस स्टेशनला दिली.दिनांक 13 /8/022 रोजी बलात्कार झाल्याची फिर्याद दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरहसन साहेब उप पोलीस निरीक्षक शितल निमजे पोलीस कॉन्स्टेबल संदीप देवकते यांनी घटनास्थळावर जाऊन आरोपी ला अटक केली घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा पीसीआर घेऊन त्यांच्या विरोधात कलम 144/022 376 ड प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक शितल निमजे संदीप देवकते करत आहेत
