तेरवी न करता तिडके परिवाराने स्मशानभूमीत बांधून दिले टिन शेड..संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीने केले तिडके परिवाराच्या निर्णयाचे स्वागत..


अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

मृत्यू हा अटळ असून मृत्यू हेच अंतिम सत्य मानले जाते.हिंदू धर्मात मृत्यूपश्चातचा विधी अतिशय खर्चिक असून या खर्चातून काहीच साध्य होत नाही.पण तरीही अनेक जण या मळलेल्या वाटेनेच जाणे पसंत करतात.मात्र सुरुवातीपासूनच पुरोगामी विचारांचे असलेल्या हिवरखेड येथील तिडके परिवाराने आपल्या आईच्या निधनानंतर तेरवी,गोडजेवन या कालबाह्य, खर्चिक प्रथेला तिलांजली देत आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ संत तुकाराम वैकुंठ धाम कार्ला वेस स्मशानभूमी येथे टिन शेड उभारून अंत्ययात्रेत वा अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांसाठी ऊन,पाऊस इत्यादी पासून बचाव होण्यासाठी टिन शेड उभारून नवीन पायंडा पाडत समाजासमोर  नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे.येथील माजी आमदार स्व.डॉ.का.शा. तिडके यांच्या पत्नी श्रीमती शशिकलाबाई तिडके यांचे १९ जुलै रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची उच्चविद्याविभूषित मुले डॉ.रामदादा तिडके,कृष्णाभाऊ तिडके,गजानन तिडके,कैलास तिडके यांनी कुटुंबातील वडीलधारी मार्गदर्शक ज्येष्ठ सदस्य नंदुभाऊ तिडके,रघुनाथजी तिडके यांच्याशी चर्चाविनिमय करून तेरवी न करता स्मशानभूमीत लोकांची सोय व्हावी ,गावकऱ्यांना जनसुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने टिन शेड बांधून दिले.या टिन शेडचा स्मृतिअर्पण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीच्या वतीने उपसरपंच रमेश दुतोंडे,महेंद्र कराळे,विलास घुंगड,पोलीस पाटील प्रकाश गावंडे,भोपळे परिवाराच्या वतीने अनिल भोपळे, महेंद्र भोपळे, गिऱ्हे परिवाराच्या वतीने मनिष गिर्हे,गोपाल गिर्हे,वंचित आघाडीच्या वतीने डॉ.प्रशांत इंगळे,कृतीशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार,ग्रामीण पत्रकार संघाचे धिरज बजाज,प्रेस क्लबचे प्रा. संतोषकुमार राऊत इ.नी तिडके परिवाराच्या या लोकोपयोगी कार्याची प्रशंसा करून स्व.शशिकलाबाई तिडके यांना आदरांजली अर्पण केली.तेरवी सारखा अनावश्यक खर्च टाळा,आदर्श विवाह करा असे नेहमी आवाहन करणाऱ्या व समाज सुधारणेची कास धरणाऱ्या हिवरखेड येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीने  तिडके परिवाराच्या या निर्णयाचे स्वागत केले असून इतरांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले आहे.यावेळी रामेश्वर शिंगणे, संजय गिर्हे,निखिल गिर्हे,पत्रकार सुरज चौबे,बाळासाहेब नेरकर सतीश इंगळे,राजेश टाले,दिलीप बाळापुरे, सुभाष कसुरकार,केशवराव टोहरे,अरुण राहणे,मनिष गोरद, सोनाजी माहोकार,शालीग्राम मोरोकार, देविदास घुंगड,संतोष शिंगणे,लक्ष्मण धांडे,दिलीप धांडे,उमेश टापरे,रमेश कराळे,प्रकाश खोब्रागडे, गजानन राऊत,सुनिल निंबोकार,गोपाल भोंगाळे,दिपक देशमुख, सारंगधर कौलकार,गजानन भटकर,रामदास गावंडे,रवी मानकर,दिनकर परनाटे,योगेश सोनोने,उमेश शेळके,नंदुभाऊ तिडके,डॉ.राम दादा तिडके,कृष्णाभाऊ तिडके,कैलास तिडके,सुनिल तिडके,उमेश तिडके इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कराळे तर आभार प्रदर्शन उमेश तिडके यांनी केले.

Previous Post Next Post