हिवरखेड सदाशिव संस्थांनवर नागपंचमी उत्सवात साजरी,गावातूनि निघे नागोबाची पाटी ,मुलां बाळांना सुखी ठेवी,


अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..

हिवरखेड सदाशिव संस्थानवर नागपंचमी साजरी करण्यात आली,गावकऱ्यांनी नागदेवताचे दर्शन घेऊन नागदेवताला दुधाचा अभिषेक केला,  सदाशिव संस्थान हे निसर्गरम्य असून या संस्थान बाजूला नागदेवताच मंदिर आहे,तसेच या संस्थानवर दत्त मूर्ती, महादेव शिवलीग ,हनुमान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, मोठे वटवृक्ष ,वारूळ असे हे संस्थान असून नागपंचमीला भाविकांनी अनेक देवतांच्या दर्शनाचा लाभ घेतला असून या संस्थान वरून गावातून नागोबाची पाटी काढण्यात येते, चंडिका चौक मरि माता  भवानी मंदिर येथे पाटी ठेवण्यात येते व पंचमीला पाटीचे पूजन करून नागोबाचा ठावा घेऊन  भवानि मंदिर येथे महाप्रसाद वितरण केला जातो.अशी ही परंपरा दरवर्षी साजरी केली जाते, यंदा सुद्धा नागपंचमी साजरी करण्यात आली,सदाशिव संस्थानवरील नागोबा मंदिरात पुजारी समाधान राऊत हे मंदिराचा कारभार पाहतात , गावात नागोबा पाटीचे भाविकांनी ठीक ठिकाणी स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला,

Previous Post Next Post