जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथून जवळच असलेल्या सोनबर्डी येथील धरणामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या लाडणापुर येथील करण मंगल शामस्कार या 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 1 आँगष्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.श्रावणातील पहिला सोमवार असल्याने मृतक करण श्यामस्कार हा आपल्या मित्रांसोबत जटाशंकर येथे गेला होता. तिथुन परत येत असताना सोनबर्डी येथील धरणावर पोहण्यासाठी गेला असता त्याच्या मित्रांनी त्याला पोहण्यास मनाई केली परंतु तरीही मृतक करण श्यामस्कार पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात गेला असता तो बाहेरच आला नाही. त्यामुळे पाण्यामध्ये काही नागरिकांनी उतरून पाहिले असता तो मिळुन आला नाही. व दिनांक 2 आँगष्ट रोजी जळगांव जा.पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रम घेऊन सदर पाण्यातील मृतदेह शोधून काढला.सदर मृतक करण श्यामस्कार याला अल्सर चा त्रास होता. सदर घटनेची फिर्याद रवींद्र अहिर यांनी जळगांव जा.पोलीस स्टेशनला दिली असता जळगांव जामोद पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय गव्हाळे,अक्षय कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मर्ग दाखल करण्यात आला. त्यानंतर मृतक करण याचे शव शवविच्छेदनाकरिता जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. करण हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असल्याकारणाने संपूर्ण लाडनापूर गावामध्ये शोककळा पसरली आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
