सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून शेषराव पाटील यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याने करण्यात आला सत्कार...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा दिनांक एक ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष अब्दुल जहीर यांच्यासह शिवसेनेचे खरेदी विक्री समिती संचालक संजय भुजबळ अनंता पाटील यांनी शाल व श्रीफळ देत शेषराव पाटील यांचा सत्कार केला. शेषराव पाटील कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी त्यांच्या सर्विस मध्ये कठीण कठीण गुन्ह्यांची उकल केली तसेच प्रेमळ व मितभासी असल्यामुळे त्यांना जळगाव जामोद तालुक्यामध्ये लहान व्यक्ती पासून ते मोठ्यांपर्यंत ओळखतात. त्यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याने सर्व स्तरामधुन त्यांना शुभेच्छा येत आहेत.

Previous Post Next Post