कोटमी गावातील मुलीचा शव शेताच्या विहिरीत आढळला...संशयित विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कुटूंबीयांची मागणी...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावातील अंबिका गोंडू मरस्कोल्हे (वय 19) या मुलीच्या मृतदेह त्यांचा शेताच्या विहिरात आढळल्यामुळे‌‌ कोटमी वाशियांमध्ये खळबळ ‌उडाली. अंबिका ही बुधवार दुपारी 3 वाजता पासून घरातून गायब होती,सगळी कडे तिचा शोध घेतला तरी मिळाली नाही. अंबिका चे मोठे बाबा शेतात गेले असता ,19 आगस्ट रात्री 8 च्या सुमारास त्यांना शेताच्या विहिरीत अंबिका चे शव दिसल्याने धक्काच बसला .कोटमी  गावातील पोलीस पाटील पंचम कंगाले यांनी तात्काळ काटकुंभ पोलीस चौकी येथे फोन करून पोलिसांना बोलविले व रात्रीच्या 1 वाजता च्या सुमारास अंबिका चे शव बाहेर काढून पंचनामा केल्यावर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्ट मार्डम करिता हलविण्यात आले. परतवाडा येथील मुलगा जाकीर उर्फ शाहरुख अंबिका ला सतत परेशान करत होता.आणी अंबिका गायब झाली त्या दिवशी ही तो मुलगा आपल्या मित्र कोटमी येथील रहिवासी अमोल उईके याचा घरी मुक्कामी होता .आणी ज्या दिवशी पासून अंबिका गायब झाली त्या दिवसा पासून ते ही गायब झाले अशी माहिती गावकरी यांचा पासून माहिती पडली .अंबिका यांचे वडील गोंडु मरस्कोल्हे यांचा  परतवाडा ,मुगलाई संशय निवासी जाकीर उर्फ शाहरुख यांचावर जात आहे.आणी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा समोर येत आहे . आता सत्य काय आहे ,कोण आरोपी व निर्दोष अंबिका याचा काही बळजबरीने काही अनुचीत प्रकार केल्यानंतर  हत्या केल्याची घटना समोर येत आहे .सत्य काय आहे ते हॉस्पिटल ची पोस्टमार्डम रिपोर्ट आल्या नंतरच समझणार आहे. पण अंबिका हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे .पुढील तपास मा.ठाणेदार राहुल वाढवे सर यांच्या मार्गदर्शाने काटकुंभ पोलीस चौकी येथील जमादार (इन्चार्ज) विलास आवारे पाटील सर ,रुपेश शिंगणे सर ,पो कॉं. पवन सातपुते सर हे करत आहे.

--प्रतिक्रिया--

1.माझी मुलगी अंबिका मरस्कोले याला परतवाडा येथील मुलगा जाकीर उर्फ शाहरुख छेडछाड करत होता.व जीवे मारण्याची धमकी वारंवार देत होता.माझा सोबत लग्न कर नाही तर तुला मी ठार मारले अशी धमकी माझा मुलीला हा झाकीर देत होता .माझा मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे मला पूर्ण संशय या जाकीर नामक व्यक्ती वर असून याचा वर खुनाचा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा.

गोंडू मरस्कोले(वडील)

2. सदर ही घटना संशयस्पद आहे   ,आणी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. पोस्ट मार्डम ची रिपोर्ट आल्यानंतर जर हत्या असल्याचा निर्दनास आल्यावर  सखोल चौकशी करून आरोपी वर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाही करु

पोलीस चौकी काटकुंभ जमादार - विलास आवारे सर

Previous Post Next Post